जयपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर चांगलाच महागात पडला. चहरने चार षटकांत 52 धावा देत एक बळी घेतला. या खराब गोलंदाजीनंतरही चहरला विशेष पुरस्कार देण्यात आला. गप्टिलला बाद केल्यानंतर त्याच्या त्याने दिलेल्या रिएक्शनमुळे हा पुरस्कार देण्यात आला.


मिळाला 'मोमेंट ऑफ द मॅच' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या डावाच्या 18व्या षटकात, गुप्टिलने पहिल्या चेंडूवर लाँग ऑनवर नो-लूक सिक्स मारला. हा षटकार मारल्यानंतर गप्टिल बराच वेळ दीपककडे पाहत राहिला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गप्टिलने डीप मिडविकेटवर आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.


मात्र तो शॉट योग्य पद्धतीने खेळला गेला नाही आणि श्रेयस अय्यरने गप्टिलचा अप्रतिम झेल घेतला. आता विकेट घेतल्यानंतर दीपक चहरनेही गुप्टिलकडे बराच वेळ टक लावून पाहत होता. सामना संपल्यानंतर दीपकने गप्टिलकडे पाहिल्याबद्दल 'अमेझिंग मोमेंट अवॉर्ड' देण्यात आला.



टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 6 गडी गमावून 164 धावा केल्या. सलामीवीर मार्टिन गप्टिलने 70 आणि मार्क चॅपमनने 63 धावांचे योगदान दिलं. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद सिराज आणि दीपक चहर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


हे लक्ष्य पार करताना भारतीय टीमने दोन चेंडू बाकी असताना 5 बाद 166 धावा करून सामना जिंकला. सूर्यकुमार यादवने 62 आणि कर्णधार रोहित शर्माने 48 धावांची शानदार खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर टीम साऊथी, डॅरिल मिशेल आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.