Marathi Sports News : भारतीय संघाची T20 वर्ल्ड कपमधील सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या 2 सामन्यात विजयानंतर तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. दक्षिण आफ्रिका संघाकडून टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सोडला तर इतर भारतीय बॅट्समन खास कामगिरी करु शकले नाही.  त्यामुळेच भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा ओपनर केएल राहुल सलग तिसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून देखील त्याच्या ऐवजी ऋषभ पंतला (Rishabh Pant) ओपनिंगला पाठवण्याची मागणी होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलँडवर विजय मिळवलाय. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खराब कामगिरीने पराभव झाला. या तिन्ही सामन्यात खराब कामगिरी करण्यांवर आता टांगती तलवार आहे.  भारतीय संघात दीपक हुड्डा (Deepak Hooda) ला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पेक्षा जास्त महत्त्व दिलं गेलं. श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये असताना देखील त्याला संघात स्थान न मिळाल्याने चाहते हैराण झाले. दीपक हुड्डाला तिसऱ्या सामन्यात संधी दिली गेली. पण तो फ्लॉप ठरला.


दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध  दीपक हुड्डा याला अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान देण्यात आलं होतं. पण तो 3 बॉल खेळला आणि एकही रन करु शकला नाही. रोहित शर्माने त्याला गोलंदाजीची संधी दिली नाही.


रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ची टी20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघात वापसी होणार आहे. दुसरीकडे अक्षर पटेल देखील चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे दीपक हुड्डाला संघात स्थान मिळवणं पुढे कठीण होऊ शकतं. दीपक हुड्डाने आतापर्यंत भारतीय संघासाठी 13 T20 सामने खेळले असून 293 रन केलेत तर 8 वनडे  सामन्यात 141 रन केले आहेत.