इंग्लंड : भारत आणि इंग्लंड महिला टीममध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडचा सूपडा साफ केलाय. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 16 रन्सने पराभव केला. भारतीय टीमच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि फिल्डींगमुळे या सामन्यात शानदार विजय मिळाला. भारतीय टीमने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करत मालिका 3-0 अशी जिंकली. मात्र या सामन्यात दिप्ती शर्माने काढलेली विकेट चर्चेचा विषय ठरतोय.


लगान चित्रपटाच्या दृश्याची इंग्लंडमध्ये पुनरावृत्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडसाठी युवा फलंदाज चार्ली डीन चांगली खेळी करत होती आणि त्याने शेवटच्या विकेटसाठी 35 रन्सची भागीदारी केली. इंग्लंडला फक्त 17 रन्सची गरज होती. 44व्या ओव्हरमध्ये चौथा बॉल फेकताना दीप्तीने पाहिलं की, नॉन-स्ट्राइकर चार्ली डीन क्रीजच्या पलीकडे गेली. दीप्ती या क्षणाचा फायदा घेत रन-अपवर थांबून डीनला रनआऊट केलं.


यावेळी थर्ड अंपायरची मदत घेतली आणि तिथूनही निर्णय भारताच्या बाजूने लागला. दीप्तीच्या या कामगिरीमुळे भारताला सामन्यात तसंच मालिकेत क्लीन स्वीप करण्यात मदत झाली. मात्र नेहमीप्रमाणे नॉन स्ट्रायकर धावून जाण्याच्या बाबतीतही वाद झाला.



इंग्लंड खेळाडू आल्या रडकुंडीला


नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा इंग्लिश खेळाडूंच्या भावना दुखावल्या गेल्या आणि खेळाडूवृत्तीविरुद्ध बोलू लागले. चार वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या इंग्लंडच्या जोस बटलरला अशाच प्रकारे बाद केलं होतं. त्यानंतर इंग्लंडचे दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. 


स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला की, खेळ संपवण्याचा हा योग्य मार्ग नाही. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय, एक रन आऊट? सामना संपवण्याचा खूप वाईट मार्ग.


आयसीसीने नियम नेमका काय?


अलीकडेपर्यंत ज्याला 'मॅकंडिंग' म्हटले जात होतं, ते आता आयसीसीच्या नियमांचा भाग होते. 1948 मध्ये पहिल्यांदा विनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अशा प्रकारे बाद केलं होतं आणि तेव्हाही महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी भारतीय गोलंदाजाला न्याय दिला होता. नुकतंच आयसीसीने याला रनआऊटच्या श्रेणीमध्ये समाविष्ट केलंय.