Delhi Capitals On Rishabh Pant Accident : टीम इंडिया आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा गेल्या वर्षी 30 डिसेंबरला भीषण अपघात झाला होता. नशीब चांगलं होतं म्हणून ऋषभ पंत एवढ्या मोठ्या अपघातातून (Rishabh Pant Accident) वाचला. ऋषभ पंतच्या अपघाताची माहिती समोर येताच, संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. अनेकांनी ऋषभसाठी पूजा-अर्चना देखील केल्या. गुडघ्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ऋषभ आता रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पुन्हा जोमाने कामाला लागला आहे. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतसाठी एक खास व्हिडीओ (Delhi Capitals emotional video) शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने एक भावनिक व्हिडिओ शेअर केलाय. एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी ऋषभचा अपघात झाला होता. अशातच दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अक्षर पटेल याने नेमकं काय झालं होतं? यावर भाष्य केलंय. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांनी दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऋषभवर भाष्य केलंय.


काय म्हणाला अक्षर पटेल?


ऋषभच्या अपघाताच्या दिवशी सकाळी सात किंवा आठ वाजता प्रतिमा दीदींनी मला फोन आला. त्यांनी मला विचारलं की, तुझी ऋषभचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? मी म्हटलं की, मी त्याला कॉल करणार होतो, पण आज मी त्याला त्याला कॉल करेल. तेव्हा दिदीने मला सांगितलं की, ऋषभचा अपघात झालाय, तुझ्याकडे त्याच्या आईचा नंबर आहे का? मला हे कळताच मला वाटलं की, हा भाऊ तर गेला..! शार्दुलपासून बीसीसीआयपर्यंत सगळ्यांनी मला कॉल केला. त्यांना वाटलं याला काही माहिती असेल. मी काही वेळाने फोनवर बोललो, तेव्हा मला कळलं की सगळं काही ठीक आहे. तेव्हा कुठं माझ्या जिवात जीव आला, असं बापू म्हणजे अक्षर पटेल म्हणतो.


मला माहितीये की, तो फायटर आहे. त्याला काहीही होणार नाही, असा विश्वास देखील अक्षरने दाखवला. अपघाताच्या 17 दिवसानंतर ऋषभने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली होती. त्यावेळी त्याने सर्वकाही ठिक असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तो मागील आयपीएल हंगामात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात देखील आला होता. तर नुकताच तो आयपीएल लिलावात दिल्लीच्या टीमसोबत होता.


पाहा Video



दिल्ली कॅपिटल्सने काय म्हटलंय?


दरम्यान, त्या भयंकर रात्रीनंतर 365 दिवस आता उलटले आहेत. तेव्हापासून विश्वास, कठोर परिश्रमाने तो खेळात जोरदार पुनरागमन करेल, कारण तो कधीही हार न मानणारा खेळाडू आहे. धाडसी, उत्साही असलेला ऋषभ पंत 2.0 लवकरच अॅक्शन करताना दिसणार आहे, अशी माहिती दिल्ली कॅपिटल्सने या व्हिडीओद्वारे दिली आहे.