IndvsSL : नव्या वर्षाच्या सुरूवातीला श्रीलंका संघ (Srilanka Team) भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने (BCCI) मंगळवारी भारतीय संघाची (Team India Squad vs Srilanka) घोषणा केली. यामध्ये एकदिवसीय संघाची जबाबदारी नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) तर टी-20 संघाची कर्णधारपदाची माळ हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गळ्यात पडली आहे. यंदा एकदिवसीय वर्ल्ड कप (ODI World Cup 2023) असून त्याआधी संघबांधणी करणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे बीसीसीआयने (BCCI) भारताचे हुकमी एक्के असलेले खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनाही संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रीडा वर्तुळात अशीसुद्धा चर्चा आहे की बीसीसीयाने त्यांना जागा दाखवून दिली आहे. कारण भारताचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजाला आशिया कपआधी दुखापत झाली होती. दुखापतीमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, यामुळे जडेला आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कप या दोन मोठ्या स्पर्धांमधून बाहेर पडला. याचा फटका भारतीय संघाला बसला, जडेजाच्या तोडीचा ऑल राऊंडर भारतीय संघाला मिळाला नाही. जडेजाला दुखापतीतून पूर्ण कव्हर होण्यासाठी अपेक्षेपक्षा जास्त वेळ लागत आहे. रविंद्र जडेजा नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये (Gujarat Assembly Election 2022) पत्नीच्या प्रचारासाठी फिरताना दिसला. 


यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह संघात नसल्यामुळे भारतीय संघाची बॉलिंग कमकुवत असल्याचं दिसली. सामना अखेरच्या षटकात गेल्यावर 7 ते 8 धावाही बुमराहने रोखत सामना जिंकून देण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. बुमराहने आताच एक व्हिडीओ शेअर केला होता त्यामध्ये तो फिट असल्याचं दिसत होतं. बुमराहसुद्धा दोन्ही आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कप स्पर्धांना मुकला होता.  


आता दोन्ही खेळाडू फिट असूनही त्यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेमध्ये निवड झाली नाही. दोघांना डावलत बीसीसीआयने जागा दाखवून दिल्याची क्रीडा वर्तुळात चर्चा आहे. तर निवड समिती त्यांना खेळवण्यासाठी कोणतीही घाई करणार नाही, असंही बोललं जात आहे. 


भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी काही वरिष्ठ खेळाडू राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी दुखापतीमुळे उपलब्ध नसतात. मात्र आयपीएलसारखी मोठी स्पर्धा जवळ आली की ते फिट असल्याचं दाखवू लागत असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. 
 
टी-20 साठी भारतीय संघ- हार्दिक पंड्या (c), इशान किशन (wk), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.


वनडेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार),  शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.