Devendra fadanvis: पुण्यातील (Pune News) मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी किताबासाठी (Maharashtra Kesari) जबरदस्त लढत पहायला मिळत आहे. या ठिकाणी ६५ वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा (Devendra Fadnavis Maharashtra Kesari final) आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या माती विभागाच्याअंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाडने (Mahendra Gaikwad) स्टार सिकंदर शेखचा (Sikandar Shaikh) 6-4 ने पराभव केला. तर दुसऱ्या मॅट सामन्यात शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) एकतर्फी बाजी मारली. (Devendra Fadnavis big announcement for wrestler on the platform of Maharashtra Kesari final pune marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवराजने माजी महाराष्ट्र केसरी राहिलेल्या हर्षवर्धन सदगीरचा (Harshvardhan Sadgir) 8-1 ने पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यामुळे काही वेळातच आता महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात फायनल सामना खेळला जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis) देखील हजेरी लावली होती. त्यावेळी फायनलपूर्वी बोलताना फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे.


काय म्हणाले फडणवीस?


महाराष्ट्र मिशन ऑलिंपिक सुरू केला जाणार आहे. आम्ही असे खेळाडू तयार करू जे ऑलिंम्पिकमध्ये मेडल जिंकून दाखवेल. आपण आपल्या कुस्तीगिरांना अत्यल्प मानधन देतो आणि गेल्या दोन वर्षापासून ते देखील बंद आहे. म्हणून, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, जे खेळाडू ऑलिम्पिक किंवा जागतिक लेवलवर खेळतात. त्यांना केवळ 6 हजार रूपये मानधन दिलं जातो. मात्र, आता या मल्लांना 6 हजारवरून 20 हजार रुपये करण्याचा निर्णय करूया, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.


हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी किंवा रुस्तमे हिंद यांना केवळ चार हजार रुपये मानधन देतो. त्यांना आता 15 हजार रुपये देण्याचा निर्णय यावेळी फडणवीसांनी घोषित केला आहे. तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त मल्लांना 6 हजार दिला जातो. त्यांना 20 हजार देणार असल्याची घोषणा फडणवीसांनी यावेळी केली. वयोवृद्ध खेळाडूंना साडेसात हजार देण्याची निर्णय फडणवीसांनी घेतल्याचं सांगितलं आहे.