Video : धनश्रीच्या इशाऱ्यांवर थिरकले विराट-मॅक्सवेल, RCB च्या नव्या म्युझिक व्हिडिओची धूम
यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने कोरिओग्राफ केलेला हा म्युझिक व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?
मुंबई : भारतीय संघाचा आघाडीचा फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये (IPL 2021) आरसीबी संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. धनश्री प्रोफेशनल डान्सर आहे आणि डान्स स्टाईलसाठी ती प्रसिद्ध आहे. आपल्या सोशल मीडियावरुन डान्सचे नवनवे प्रकार ती प्रेक्षकांना दाखवत असते.
सध्या धनश्री वर्मा सोशल मीडियावर आणखी एका गोष्टीसाठी चांगलीच चर्चेत आहे, आणि यावेळी कारण आहे तीने केलेल्या कोरिओग्राफीमुळे. नुकतंच इंडियन प्रिमिअर लीगमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (Royal Challengers Banglore) एक नवा व्हिडिओ रिलीज झाला आहे. ‘Never Give Up. Don’t Back Down. Keep Hustling असं हे गाणं असून यावर विराट कोहलीसह संघातील अनेक प्रमुख खेळाडू डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण गाणं धनश्री वर्माने कोरिओग्राफ केलं आहे.
म्युझिकवर थिरकले क्रिकेटपटू
या म्युझिक व्हिडिओमध्ये सर्व क्रिकेटपटूंच्या डान्सची कोरिओग्राफी धनश्रीने केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.
आरसीबीच्या चाहत्यांची या म्युझिक व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. खेळाडू आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफचे आभार मानण्यासाठी आरसीबीने हा म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओमध्ये विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), देवदत्त पडिक्कल आणि एबी डिव्हिलियर्स डान्सबरोबरच धमाल मस्ती करताना दिसत आहेतय. या गाण्याला संगीत हर्ष उपाध्याय यांनी दिलं आहे.
धनश्रीचा ड्रीम प्रोजेक्ट
धनश्री वर्माचे इंस्टाग्रामवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कोरिओग्राफर म्हणून धनश्रीसाठी आरसीबीचा हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, RCB चा नवीन म्युझिक व्हिडिओ तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यास उत्सुक आहे. हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आणि 2021 चा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ आहे, क्रिकेटमध्येच नव्हे तर प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक असलेल्या या दिग्गजांसोबत काम करणे हा माझ्यासाठी आयुष्यातला मोठा क्षण आहे. या संधीसाठी मी सर्व क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानते.