मुंबई : कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team india) आयर्लंड विरूद्ध टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. या विजयानंतर भारतीय संघ सेलिब्रेशन करताना दिसतोय. या खेळाडूंसोबत त्यांचे कुटूंबदेखील सेलिब्रेशन करतात.असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत खेळाडूची पत्नी आयर्लंडच्या रस्त्यावर डान्स करताना दिसलीय. (dhanshree verma Dance sona kitna sona hai on ireland india vs ireland t20 Hardik pandya)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माही (dhanshree verma) सध्या आयर्लंडमध्ये आहे. धनश्रीने आयर्लंडच्या रस्त्यावर डान्स करताना एक रील बनवलीय. तिची ही रिल इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.


धनश्री वर्माने गोविंदाच्या 'सोना कितना सोना है' या गाण्यावर डान्स केला. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखाहून अधिक वेळा चाहत्यांनी पाहिलाय. तसेच हा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे.



दरम्यान धनश्री एक प्रोफेशनल डान्सर आणि कोरिओग्राफर आहे, ती सतत तिचे डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.   धनश्रीने युझवेंद्र चहलच्या साथीने अनेक रील देखील बनवले आहेत.  


भारताने दोन सामन्यांची टी-20 मालिका क्लीन स्वीप करून जिंकली. दुसऱ्या T20 मध्ये भारताने 225 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. या सामन्यात 4 धावांनी टीम इंडियाने विजय मिळवला.