मुंबई : चँम्पियन्स ट्रॉ़फीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर याच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. कोणी बॉलर्सला दोषी ठरवतंय तर कोणी कोहलीला. चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि इंग्लंडला प्रबळ दावेदार म्हटलं जातं होतं. पण कप पाकिस्तान घेऊन गेला.पण माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला कदाचित हे आधीच कळून चुकलं होतं. धोनीने याबाबत म्हटलं देखील होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडेमध्ये भारताच्या विरोधात पाकिस्तानचा रेकॉर्ड चांगला आहे. पण आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारत नेहमीच पाकिस्तानवर भारी पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत तब्बल १८० रन्सने हारला. त्यानंतर धोनीचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. पण हा व्हिडिओ २०१६ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरोधात मिळालेल्या विजयानंतरचा आहे. धोनीने म्हटलं की जसं भारत 0-11 ने पुढे असल्याचा पाकिस्तानवर प्रेशर असतं तसं भारतावरही 11-0 चं प्रेशर असतं. 


पाहा नेमकं काय बोलला धोनी