मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामनात गोलंदाजांचा पगडा दिसला. शुक्रवारी टॉस जिंकून इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताच्या फलंदाजांना 50 षटकांत चार गडी बाद करत 251 धावांवर रोखलं. भारताने  यजमान इंडिजला मात्र 158 धावांवर ऑलआऊट करत ९३ रनने विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्रसिंग धोनी (78), अजिंक्य रहाणे (72) धावा केल्या तर रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवने 3-3 विकेट घेत गोलंदाजीत मोठे योगदान दिले.


या सामन्यात धोनीने आपल्या नावे एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 सिक्स मारण्याचा केरॉर्ड बनवला आहे. आणि 200 सिक्स मारणार तो पहिला भारतीय ठरला आहे.


294 सामन्यांमध्ये धोनीने 9442 रन केले आहे. आपल्या शानदार सिक्समुळे ओळखला जाणाऱ्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 332 सिक्स मारले आहेत. सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या दोन सामन्यात धोनीने काही विशेष कामगिरी नाही केली त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. पण तिसऱ्या सामन्यात त्याने 79 चेंडूत 78 धावांची खेळी केली.