धोनीची ती चूक भारताला महाग पडणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशनं भारताला विजयासाठी २६५ रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे.
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशनं भारताला विजयासाठी २६५ रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतीय बॉलर्सनी या मॅचमध्ये अचूक मारा केला असला तरी धोनीनं मात्र विकेट कीपिंग करताना एक चूक केली. धोनीच्या या चुकीमुळे भारताला ५ रन्सची पेनल्टी देण्यात आली.
बांग्लादेशचा स्कोअर १६१/३ असताना धोनीनं स्टम्पवर थ्रो मारण्याचा प्रयत्न केला. पण स्टम्पजवळच धोनीच्या ग्लोव्हजना बॉल लागल्यामुळे अम्पायरनं बांग्लादेशला ५ रन्स दिल्या. आयसीसीच्या नियमांनुसार विकेट कीपर किंवा फिल्डरनं मैदानामध्ये ग्लोव्हज, हॅट, टोपी किंवा हेल्मेट ठेवलं आणि यापैकी कशालाही बॉल लागला तर बॅटिंग टीमला ५ रन्स दिल्या जातात. विकेट कीपिंग करताना धोनीची चपळता आपण अनेक वेळा पाहिली आहे. यावेळी मात्र धोनीनं पहिल्यांदाच कीपिंग करताना अशी चूक केली असावी.
पाहा नेमकं काय केलं धोनीनं