डरबन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. सहा मॅचच्या या सीरिजमध्ये धोनीला दोन विश्वविक्रम करण्याची संधी आहे. या सीरिजमध्ये धोनी १० हजार रन्स आणि ४०० विकेटचं रेकॉर्ड त्याच्या नावावर करु शकतो. १० हजार रन्स पूर्ण करायला धोनीला फक्त १०२ रन्सची आवश्यकता आहे. हे रेकॉर्ड केल्यावर धोनी जगातला १२ वा आणि भारताचा चौथा बॅट्समन बनेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीनं आत्तापर्यंत ३१२ मॅचच्या २६८ इनिंगमध्ये ५१.५५च्या सरासरीनं ९८९८ रन्स बनवल्या आहेत. भारताकडून सचिन तेंडुलकर(१८,४२६), सौरव गांगुली(११,३६३) आणि राहुल द्रविड(१०,८८९) यांनी १० हजार रन्सचा टप्पा ओलांडला आहे.


धोनीनं १० हजार रन्सचा टप्पा ओलांडला तरी सर्वात जलद १० हजार रन्स करण्याचं रेकॉर्ड धोनीच्या नावावर होणार नाही. तेंडुलकरनं २५९, गांगुलीनं २६३, रिकी पॉटिंगनं २६६ इनिंगमध्ये १० हजार रन्स बनवल्या. धोनीनं आत्तापर्यंत २६८ इनिंग खेळल्या आहेत. तर जॅक कॅलिसनं २७२ इनिंगमध्ये १० हजार रन्स केल्या होत्या.


विकेट कीपिंगचंही होणार रेकॉर्ड


विकेट कीपिंग करताना वनडे क्रिकेटमध्ये ४०० विकेट घ्यायचं रेकॉर्ड करायला धोनी २ विकेटनी दूर आहे. धोनीनं आत्तापर्यंत २९३ कॅच आणि १०५ स्टम्पिंग असे मिळून ३९८ बळी घेतले आहेत. कुमार संगकारा(४७२), ऍडम गिलख्रिस्ट(४७२) आणि मार्क बाऊचर(४२४) हे खेळाडू धोनीच्या पुढे आहेत. तसंच कॅचचं त्रिशतक पूर्ण करायला धोनीला आणखी ७ कॅचची आवश्यकता आहे. हे रेकॉर्ड करणारा धोनी चौथा विकेट कीपर बनेल. धोनीआधी गिलख्रिस्ट, बाऊचर आणि संगकाराच्या नावावर हे रेकॉर्ड आहे.


तर कोहलीचंही होणार रेकॉर्ड


धोनीबरोबरच कोहलीकडेही वनडे क्रिकेटमध्ये १०० सिक्स पूर्ण करण्याची संधी आहे. कोहलीनं आत्तापर्यंत २०२ मॅचमध्ये ९८ सिक्स लगावल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये एकूण ३२ बॅट्समननी १०० पेक्षा जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. यामध्ये धोनी(२१६), तेंडुलकर(१९२), गांगुली(१९०), रोहित शर्मा(१६३), युवराज सिंग(१५५), विरेंद्र सेहवाग(१३५) आणि सुरेश रैना(१२०) या सात भारतीयांनी वनडेमध्ये १०० पेक्षा जास्त सिक्स मारल्या आहेत.