कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे. पहिले बॅटिंग करून श्रीलंकेनं भारतापुढे विजयासाठी १७१ रन्सचं लक्ष्य ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना कोहलीनं ८२ आणि मनिष पांडेनं नाबाद ५१ रन्सची खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये धोनीनं पुन्हा एकदा त्याचा दिलदारपणा दाखवला आहे. धोनीनं मनिष पांडेला त्याचं अर्धशतक पूर्ण करायला मदत केली. याआधीही चौथ्या वनडेमध्ये धोनीनं मनिष पांडेला अर्धशतक पूर्ण करायला मदत केली होती.


श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मध्ये १८व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर विराट कोहली आऊट झाला, यानंतर धोनी मैदानात आला. धोनी खेळण्यासाठी आला असताना मनिष पांडे स्ट्राईकला होता. मनिषनं चौथ्या बॉलवर दोन रन काढले, पाचव्या बॉलवर फोर मारली आणि सहाव्या बॉलवर पुन्हा दोन रन काढल्या.


१९ व्या ओव्हरमध्ये धोनी स्ट्राईकला आला तेव्हा त्याला फोर किंवा सिक्स मारून भारताला जिंकवता आलं असतं पण त्यानं एक रन काढून पुन्हा पांडेला स्ट्राईक दिली. स्ट्राईकला आला तेव्हा पांडे ४७ रन्सवर होता. मग त्यानं फोर मारून अर्धशतक पूर्ण केलं आणि भारताला जिंकवलं.