धोनीला संघातील आपली भूमिका समजायला हवी: सेहवाग
मैदानासोबतच मैदानावरही सतत चर्चेत असणारा भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या खास स्टाईलमध्ये महेंद्र सिंग धोनीला सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली : मैदानासोबतच मैदानावरही सतत चर्चेत असणारा भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या खास स्टाईलमध्ये महेंद्र सिंग धोनीला सल्ला दिला आहे.
धोनीला सल्ला देताना म्हटले आहे की, धोनीने पहिल्या चेंडूपासूनच मैदानावर आक्रमक खेळी करायला हवी. तसेच, समोरच्या गोलंदाचा चांगलाच समाचार घ्यायला हवा. भारतीय संघ सध्या दबावात आहे. माजी कर्नधार राहीलेल्या धोनीने टी-२०मधील आपली भूमिका समजून घ्यायला हवी असेही सेहवागने म्हटले आहे.
धोनीने न्यूजीलंडविरूद्धच्या टी-२०च्या दूसऱ्या सामन्यात ३७ चेंडूत ४९ धावा केल्या. मात्र, तरीही त्याच्या निवडीबद्धल अनेक प्रश्न उपस्थीत केले जात आहेत. एका वृत्तवाहीनीशी बोलताना सेहवागने म्हटले की, धोनीने आपली भूमिका समजून घ्यायला हवी. त्यासाठी त्याने सुरूवातीपासूनच आक्रमक धोरण अवलंबत वेगाने धावसंख्या उभारायला हवी, असे सेहवाग म्हणाला.
दरम्यान, भारतीय संघाला सध्या धोनीची आवश्यता आहे. तसेच, टी-२०मध्येही धोनीची गरज आहे. असे सांगतानाच योग्य वेळी तो निवृत्ती घेईल आणि युवा खेळाडूसाठी जागा निर्माण होईल असेही मत सेहवागने व्यक्त केले.