कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये धोनी ३००वी वनडे खेळला आहे. या मॅचमध्ये धोनीनं ४२ बॉल्समध्ये नाबाद ४९ धावा केल्या. ३००वी वनडे खेळणाऱ्या धोनीनं या मॅचमध्ये आणखी एका रेकॉर्डला गवसणी घातली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नॉट आऊट राहण्याचा विश्वविक्रम धोनीनं केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये धोनी ७३ वेळा नॉट आऊट राहिला आहे. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा शेन पॉलॉक आणि श्रीलंकेचा चामुंडा वास ७२ वेळा नॉट आऊट राहिले होते. 


३०० पेक्षा जास्त वनडे खेळणारा धोनी हा सहावा भारतीय खेळाडू बनणार आहे. भारताकडून सचिन तेंडुलकर(४६३), राहुल द्रविड(३४४), मोहम्मद अजहरुद्दीन(३३४), सौरव गांगुली (३११) आणि युवराज सिंग (३०४) वनडे खेळले आहेत.