VIDEO : वीजेपेक्षाही जलद धोनीचे हात, मॅचचं चित्रच पलटलं
विकेट किपिंग करत असताना धोनीचे हात वीजेपेक्षाही जलद चालतात, असं नेहमीच म्हणलं जातं.
विशाखापट्टणम : विकेट किपिंग करत असताना धोनीचे हात वीजेपेक्षाही जलद चालतात, असं नेहमीच म्हणलं जातं. विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्येही याचाच प्रत्यय आला. श्रीलंकेच्या उपुल थरंगाला स्टंपिंग करून धोनीनं सगळ्या मॅचचं चित्रच पलटवून टाकलं. थरंगा स्टंपिंग झाला नसता तर श्रीलंकेनं मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली असती.
तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर जसप्रीत बुमराहनं श्रीलंकेचा स्कोअर १३ रन्स असताना पहिला झटका दिला. पहिली विकेट गेल्यावर उपुल थरंगा आणि सदीरा समरविक्रमानं भारतीय बॉलर्सच्या धुलाईला सुरुवात केली. थरंगानं फक्त ३६ बॉल्समध्येच अर्धशतक केलं. हार्दिक पांड्याच्या एकाच ओव्हरमध्ये थरंगानं ५ फोर लगावल्या.
थरंगानं समरविक्रमासोबत १२१ रन्सची पार्टनरशीप केली. पण २८व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवच्या बॉलिंगवर धोनीनं डोळ्याची पापणी लवण्याच्या आतमध्येच थरंगाला स्टंपिंग केलं. ८२ बॉल्समध्येच ९५ रन्स बनवून थरंगा आऊट झाला. यानंतर मात्र श्रीलंकेच्या घसरगुंडीला सुरुवात झाली आणि ४४.५ ओव्हरमध्ये २१५ रन्सवर ऑल आऊट झाला.
पाहा धोनीचा जलद स्टंपिंग