103 years old S Ramdas : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याची संपूर्ण जगात खूप जास्त फॅन फॉलोइंग आहे. खूप सारे लोक धोनीला त्यांच्या जीवनातील आदर्श मानतात, तर अनेक फॅन्सला तर माहीला जवळून भेटण्याची इच्छा आहे. अशाचपद्धतीने 103 वर्षाचे एस रामदास यांचेही त्यांच्या जीवनात एकदातरी महेंद्रसिंग धोनीला भेटण्याचे स्वप्न आहे. 103 वयामध्येसुद्धाही एस रामदास हे चेन्नई सुपर किंग्स आणि महेंद्रसिंग धोनीला खूप मनापासून सपोर्ट करतात. 



एस रामदास यांचे धोनीवर विधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपर किंग्सने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एस रामदास यांचा खूप छान व्हिडिओ शेयर केलाय, हा व्हिडीओ लोकांमध्ये जबरदस्त व्हायरल होतोय, तर खूप साऱ्या थाला फॅन्सला हा व्हिडिओ आवडतसुद्धा आहे.
या व्हिडिओमध्ये एस रामदास हे त्यांचा सर्वात आवडता क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची खूप प्रशंसा करताना  दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून चेन्नईचे फॅन्स, एस रामदास यांचे क्रिकेट आणि धोनीबद्दल असलेलं प्रेम पाहून आश्चर्यतकीत झाले आहेत. या व्हिडिओमध्ये ते बोलत आहेत की, "मी एक वरिष्ठ माणूस आहे, मला क्रिकेटपासून एक वेगळा लगाव आहे, मला क्रिकेट बघायला सुद्धा आवडतं, पण खासकरून जेव्हा धोनी हा मैदानावर खेळत असतो, तेव्हा माझ्या अंगात एक वेगळी उर्जा येते आणि मी मनापासून खूश होतो. पण मी क्रिकेटचा कितीही मोठा फॅन असलो तरी, मला क्रिकेट खेळायला मात्र एवढं आवडत नाही. मी क्रिकेट खेळायाला खूप घाबरतो. पण माझी मनापासुन एक इच्छा आहे की, मला चेन्नईचे होमग्राउंड असलेले चेपॉकच्या मैदानावर धोनीला खेळताना बघायचे आहे आणि यासोबतच मला माहीला भेटायची सुद्धा आहे." 


आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रदर्शन


आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, यातून त्यांनी 4 सामने जिंकून 8 गुणांसोबत, पॉइंट्स टेबलच्या पाचव्या स्थानावर आपली जागा पक्की केली आहे. आता आयपीएल 2024 च्या 9 व्या सामन्यात चेन्नईसमोर, तगड्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे.


CSK स्क्वॉड 2024 -
एमएस धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महिष थीक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रहमान, अवनीश राव अरावली.