मुंबई : आयपीएल 2018 च्या पहिल्या क्वालीफायर सामन्यामध्ये चेन्नईचा कर्णधार धोनीने टॉस जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीच्या आधी बॉलिंगच्या निर्णयाला गोलंदाजांनीही साथ दिली. मैदानावर उतरताच गोलंदाजांनी हैदराबादला धक्के दिले. धवनला पहिल्याच बॉलमध्ये आऊट केलं. आपल्या जबरदस्त बॉलिंगच्या जोरावर चेन्नईने हैदराबादची टॉप ऑर्डरला लवकर माघारी पाठवलं.


हैदराबादने 4 विकेट गमवत फक्त 50 रन केले. हैदराबादचा ओपनर धवन पहिल्यांदा शुन्यावर आऊट झाला. यानंतर दुसरा ओपनर गोस्वामी (12) रनवर, विलियमसन (24) रनवर आउट झाला. चौथा विकेट शाकिबचा पडला. त्याने 12 रन केले. हैदराबादच्या टीमने 4 विकेट गमवत 7 ओव्हरमध्ये फक्त 50 रन केले. धोनीने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर आधी बॉलिंग करणारी मग टार्गेटचा पाठलाग करणारी टीम जिंकते. असं आतापर्यंत दिसलं आहे.