सुपर कूल Dhoni चा पत्नी साक्षीसोबतचा डान्स व्हिडिओ व्हायरल
धोनीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई : एमएस धोनीचे जगभरात चाहते आहेत. धोनीच्या प्रत्येक गोष्टींवर त्यांची नजर असते. धोनी काय करतोय याबाबत त्यांना उत्सूकता ही असते. धोनीची पत्नी साक्षी धोनी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांना माही काय करत आहे हे सांगत असते. सोशल मीडियावर माही फारच कमी सक्रिय असूनही या प्लॅटफॉर्मवर तो क्वचितच पोस्ट करताना दिसला आहे. पण माहीच्या वतीने साक्षी नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने आतापर्यंत शेअर केले आहेत.
साक्षी धोनीने काही व्हिडिओ आणि फोटो आपल्या इंस्टा आणि ट्विटरवर शेअर केले आहेत.
धोनी आपल्या पत्नीसह नाचताना दिसत आहे.
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एमएस धोनी युएईमध्ये आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता आणि आता तो आयपीएलच्या 14 व्या सत्रात खेळताना दिसणार आहे. या क्षणी, तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे, तसेच तो शेती देखील करत आहे.
धोनीच्या नेतृत्वात सीएसकेची टीम गेल्या मोसमात चांगली कामगिरी करू शकली नाही. सीएसके प्लेऑफमध्येही पोहोचली नव्हती. अशा परिस्थितीत या मोसमात संघाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी धोनीवर दबाव असेल, तसेच संघात नवीन खेळाडूंची एंट्री या लिलावाद्वारे होणार असल्याने या संघात थोडा बदल दिसेल.