हरमनप्रीत कौर ८४ नंबरची जर्सी का घालते?जाणून घ्या कारण
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
या वर्ल्डकपपर्यंत अनेकांना भारतीय महिला संघातील अनेकांची नावेही माहित नव्हती. मात्र या वर्ल्डकपमधून महिला संघातील अनेक चेहरे समोर आलेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नाबाद १७१ धावांच्या दमदार खेळीने तिला एका रात्रीत स्टार बनवले. हरमनप्रीत कौर ८४ नंबरची जर्सी घालते. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का?
हरमनप्रती १९८४मध्ये झालेल्या दंगलीतील पीडितांच्या एकजुटीसाठी ही जर्सी घालते. या प्रकरणी ती खूप स्पष्ट आणि बिनधास्तपणे बोलते.
१९८४मध्ये झालेली दंगल हा भारताच्या इतिहासाती दु:खद अध्याय होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ही दंगल झाली होती. या दंगलीतील पीडितांसाठी तिने आपले यश समर्पित केलेय.