...म्हणून या तुफान फलंदाजाने बॅटवर लावलाय गेंड्याचा स्टिकर
रोहितच्या बॅटवर असलेला स्टीकर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. गेंड्याचा फोटो स्टीकर त्याच्या बॅटवर आहे.
मुंबई : हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये हिट ठरला नाही. त्याने १८ बॉलमध्ये केवळ १५ रन्स केले. शेन वॉटसनच्या बॉलिंगला त्याने कॅच दिली. त्याची बॅट चालली नाही.पण त्याच्या बॅटवर काहीतरी वेगळ दिसलं. म्हणून केविन पिटरसनने त्याचे फोटो शेअर केले. रोहितच्या बॅटवर असलेला स्टीकर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. गेंड्याचा फोटो स्टीकर त्याच्या बॅटवर आहे. रोहितने आपल्या बॅटवर गेंडा का चिटकवला असेल ? असा प्रश्न उभा राहतो. या गेंड्याचा अर्थ काय ? रोहितने हा गेंडा बॅटवर चिटकवण्याच कारण काय असेल ? असेही विचारले जातेय. या सर्वाच उत्तर केविन पिटरसनच्या ट्विटमध्ये आहे.
SORAI चा सिंबॉल
हा गेंडा SORAI चा सिंबॉल आहे. याचा अर्थ सेव्ह अवर राइनो आफ्रिका इंडिया. म्हणजेच गेंडा वाचविण्याची मोहिम.
इंग्लडचा स्टार बॅट्समन केविन पिटरसनने ही मोहीम सुरू केलीय. रोहित शर्माने या मोहिमेला पाठिंबा देत बॅटवर गेंडा चिटकवलाय. पिटरसनने या मोहिमेबद्दल काही दिवसांपुर्वी हिंदीमध्ये ट्विट केलं होतं.
याबद्दल खूप चर्चा झाली. केविन पिटरसन चांगल काम करतोय म्हणून रोहित शर्मा त्याला प्रमोट करतोय. यासाठी रोहितच कौतुक करावं तितक कमी. पण रोहितची बॅट चालण हे टीमसाठी जास्त महत्त्वाच आहे.
तो कॅप्टन असल्याने त्याच्यावरची जबाबदारीही वाढली आहे. बॅटवर स्टिकर लावून मोहिम चालवणं चांगलच पण बॅटही चालली पाहिजे अस रोहितच्या चाहत्यांच म्हणणं आहे.