कोलंबो : बांग्लादेशविरुद्ध मागच्या वर्षी आजच्याच दिवशी १८ मार्च २०१८ ला अखेरच्या बॉलवर ५ रनची गरज असताना सिक्स मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. या घटनेला आज वर्षपूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे निदहास ट्रॉफी टी-२० सीरिजमधील ही फायनल मॅच होती.


१९ व्या ओव्हरमधील थरार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 


या मॅचमध्ये बांग्लादेशने प्रथम बॅटिंग करताना १६६ रन केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी १६७ रनचे आव्हान मिळाले. मनिष पांडे आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोअर १८ ओव्हरमध्ये ५ बाद १३३ असा होता. पांडे आऊट झाल्यानंतर जेव्हा दिनेश कार्तिक मैदानात आला, तेव्हा भारताला विजयासाठी १२ बॉलमध्ये ३४ रनची गरज होती. दिनेश कार्तिकने मैदानावर येताच आपल्या विस्फोटक खेळीला सुरुवात केली. कार्तिकने रुबेलच्या १९ ओव्हरमध्ये २२ रन कुटल्या. यात त्याने २ सिक्स, २ फोर आणि दुहेरी रन घेतल्या. बांग्लादेश कडून अखेरची ओव्हर सौम्या सरकारने केली. या ओव्हरमध्ये विजय शंकर स्ट्राईकवर होता. भारताला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १३ रनची आवश्यकता होती. 


मॅच विनिंग शॉट



 


सौम्या सरकारने पहिला बॉल वाईड टाकल्याने भारताला विजयासाठी १२ रनची गरज होती. यानंतर पुढील बॉलवर एकही रन मिळाली नाही. दुसऱ्या बॉलवर १ रन घेत विजयने कार्तिकला स्ट्राईक दिली. पुढील बॉलवर कार्तिकने १ रन काढली. यामुळे मॅच कोण जिंकणार या बद्द्लची उत्कंठा शिगेला पोहचली. स्ट्राईक वर असलेल्या विजयने चौथ्या बॉ़लवर फोर लगावला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी २ बॉलमध्ये ५ रनची गरज होती. पण ५ व्या बॉलवर विजय शंकर कॅच आऊट झाला. विजय आऊट झाल्याने आता मॅच रंगतदार झाली होती. विजय कॅच आऊट झाल्याने कार्तिकने स्ट्राईक चेंज केली. भारताला आता विजयासाठी ५ रनची गरज होती, आणि १ बॉल शिल्लक होता. त्यामुळे जर मॅच जिंकायची तर सिक्स शिवाय पर्याय नव्हता. अखेरच्या बॉलवर कार्तिकने सौम्य सरकारच्या बॉलवर एकस्ट्रा कव्हरच्या दिशेने सिक्स लगावला, आणि भारताचा ४ विकेटने विजय झाला.


वर्षभरात बदलेली स्थिती


बांग्लादेश विरोधात शेवटच्या बॉलवर कार्तिकने सिक्स मारुन विजय मिळवून दिला. त्यामुळे दिनेश कार्तिक एक फिनीशर म्हणून उद्यास आला होता. परंतू तो सध्या स्थितीत टीमबाहेर आहे. दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला भारतीय टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये संधी दिली होती. पण ऋषभ पंतने निराशा केल्यामुळे वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये पुन्हा दिनेश कार्तिकची निवड होऊ शकते.