ना बुमराह ना झहीर, जगातील सर्वोत्तम डेथ बॉलर कोण? दिनेश कार्तिकने घेतलं विराटच्या दुश्मनाचं नाव!
Dinesh Karthik on Haris Rauf: विराटने ज्या गोलंदाजाला आस्मान दाखवलं. याच हारिस रॉफ (Haris Rauf) याचं दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) कौतूक केलं आहे.
Best Death Bowlers in the world: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (India vs Pakistan match in T20 World Cup) सामना सुरू होता. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मैदानात पाय रोवून उभा होता. कोहली गोज डाऊन द ग्राऊंड, कोहली गोज आऊट ऑफ द ग्राऊंड..., हर्षा भोगले यांचे शब्द आजही ऐकल्यावर प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. विराट कोहलीने पाकिस्तानच्या हारिस रौफ (Haris Rauf) याला दोन खणखणीत सिक्स मारले आणि सामन्याचा निकालच फिरला. पुन्हा एकदा किंग कोहलीने आपली बादशाहत सिद्ध केली. विराटने ज्या गोलंदाजाला आस्मान दाखवलं. याच हारिस रॉफचं दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) कौतूक केलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमची 'स्पीड गन' अशी ओळख असणाऱ्या हारिस रौफ याला दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik on Haris Rauf) वेगळी ओळख दिली आहे. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी हारिस रॉफ एक असल्याचं दिनेश कार्तिकने म्हटलं आहे. त्यावेळी त्याने हारिस रॉफ आणि बुमराहची देखील तुलना केली. टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याच्यापेक्षा हारिस हा फलंदाजांना अधिक धोकादायक गोलंदाज वाटतो, असं दिनेश कार्तिक म्हणाला आहे.
नेमकं काय म्हणतो डीके?
हारिस रॉफ लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तो फक्त पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करत नाही तर डेथ ओव्हरमध्ये देखील तो घातक गोलंदाजी करू शकतो. हारिसपेक्षा चांगला गोलंदाज आताच्या काळात क्वचितच असेल, असंही डीकेने म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी तो टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. त्यानंतर त्याला पीएसएलमध्ये लाहोर संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली गोलंदाजी करतोय, असंही दिनेश कार्तिक म्हणाला आहे.
दरम्यान, 2020 मध्ये पाकिस्तानच्या संघात स्थान मिळवलेल्या हारिस रॉफने कमी कालावधीतच नाव कमलंय. तो पाकिस्तानकडून आत्तापर्यंत 85 सामने खेळलाय. सध्या आशिया कपच्या पार्श्वभूमीवर तो इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड मेन्स’ स्पर्धा खेळतोय. त्यानंतर तो भारताविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये देखील दिसणार आहे. त्याआधी दक्षिणी ब्रेव्हविरुद्ध भेदक गोलंदाजी करत 27 धावा देऊन त्याने तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या गोलंदाजीने दिनेश कार्तिक प्रभावित झाला आहे.