IND vs PAK WC 2023 : पाकिस्तान नेहमी टीम इंडियाकडून का हारतो? वर्ल्ड कपआधी वकार युनूसने केली पोलखोल, म्हणतो...

Waqar Younis, ICC ODI World Cup 2023: भारताविरुद्ध सामना म्हटल्यावर प्रत्येकावर दडपण असतं. त्यामुळे आम्ही नेहमी भारतापेक्षा एक पाऊल मागं राहिलोय, असं वकार युनूसने म्हटलंय.

Aug 05, 2023, 23:38 PM IST

India Vs Pakistan : आगामी वनडे वर्ल्ड कपला (ICC ODI World Cup 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपचा थरार पहायला मिळणार आहे. त्यासाठी आता सर्व संघ सज्ज झाल्याचं दिसतंय. अशातच 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान ( IND vs PAK WC 2023) यांच्यात हाय व्होल्टेज सामना खेळवला जाईल, अशातच आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसने (Waqar Younis) याने पाकिस्तान संघाची पोलखोल केली आहे.

1/5

प्रेशरचा सामना

आम्ही जेव्हा खेळायचो, तेव्हा संघावर प्रेशर कमी होतं. आता संघावर प्रेशर अधिक आहे. कमी प्रेशर घेतल्यावर तुम्ही चांगली कामगिरी करता. मात्र, काहीही असलं तरी मोठ्या सामन्यात तुम्हाला प्रेशरचा सामना करावाच लागतो, असं वकार युनूस म्हणतो

2/5

भारत vs पाकिस्तान सामना

भारत पाकिस्तान सामना असेल तर साहजिकच दबाव अधिक असतो. आमच्या काळात मात्र हा कमी होता कारण, आम्ही सुरूवातीच्या काळात एकमेकांविरूद्ध खूप क्रिकेट खेळलो आहे. आता जास्त सामने होत नाहीत.

3/5

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताकडून का हरतो?

वर्ल्ड कपमध्ये नेहमी प्रेशर असतो. त्यात भारताविरुद्ध सामना म्हटल्यावर प्रत्येकावर दडपण असतं. त्यामुळे आम्ही नेहमी भारतापेक्षा एक पाऊल मागं राहिलोय, असं वकार युनूसने म्हटलंय.

4/5

बाबर आझमवर विश्वास

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ प्रेशर हातळण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास वकार युनूसने व्यक्त केला आहे.

5/5

पाकिस्तानचा मॅच विनर कोण?

एकटच्या जीवावर सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंमध्ये बाबर आझम, शाहीन अफ्रिदी, फखर जमान या खेळाडूंचा समावेश आहे, असं वकार युनूस म्हणतो.