मुंबई : क्रिकेटमध्ये एखाद्या क्रिकेटरचा रेकॉर्ड तुटला तर त्याला तो रेकॉर्ड तोडणाऱ्याबद्दल असुया वाटते... पण, असं मात्र धोनीबद्दल होणार नाही... उलट धोनीला आपला रेकॉर्ड तुटला याबद्दल बरंच वाटेल... धोनीचा रेकॉर्ड तोडलाय कोलकाता टीमचा कॅप्टन दिनेश कार्तिकनं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या नावावर एका विचित्र रेकॉर्डची नोंद झाली होती. टी-20 लीगमध्ये सोमवारी कार्तिकनं धोनीचा हा विचित्र रेकॉर्ड तोडलाय...


अखेर धोनीचा तो रेकॉर्ड तुटला

दिनेश कार्तिकनं दिल्लीविरुद्ध खेळताना 19 रन्स काढून टी-20 लीगमध्ये 3000 रन्स पूर्ण केले. कार्तिकनं टी-20मध्ये सर्वात धीम्या गतीनं 3000 रन्स बनवण्याचा रेकॉर्ड केलाय. दिनेशपूर्वी हा रेकॉर्ड धोनीच्या नावावर नोंदवला गेला होता.  


156 व्या मॅचमध्ये कार्तिकला 3000 रन्स पूर्ण करणं शक्य झालं. तो या एलिट क्लबमध्ये सहभागी होणारा सातवा भारतीय आणि 12 वा बॅटसमन आहे. 


तर धोनीनं 131 व्या मॅचमध्ये 3000 रन्सचा टप्पा गाठला होता. या यादीत 121 मॅचसहीत रॉबिन उथप्पा तिसऱ्या स्थानावर आहे.