कार्तिकच्या या खेळीने झाली धोनीची आठवण
राजस्थान आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाताने १८.५ षटकांत १६३ धावा करत सामना जिंकला. या सामन्यादरम्यान कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने जबरदस्त स्टम्पिंग करताना चाहत्यांचे मन जिंकले. हे स्टम्पिंग पाहिल्यानंतर धोनीची जरुर आठवण झाली.
मुंबई : राजस्थान आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाताने १८.५ षटकांत १६३ धावा करत सामना जिंकला. या सामन्यादरम्यान कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने जबरदस्त स्टम्पिंग करताना चाहत्यांचे मन जिंकले. हे स्टम्पिंग पाहिल्यानंतर धोनीची जरुर आठवण झाली.
सामन्यातील ७वी ओव्हर सुरु असताना ही घटना घडली. जेव्हा अजिंक्य रहाणे नीतिश राणाच्या बॉल खेळताना शॉट चुकला. राणाने टाकलेला चेंडू खेळण्यासाठी रहाणे पुढे सरसावला मात्र अंदाज न आल्याने बॉल विकेटकडे पडला. यानंतर कीपिंग करणाऱ्या दिनेशने वेगाने तेथे धाव घेतली आणि बॉल घेत जोरात डाइव्ह मारत स्टम्प आऊट केले.
ज्या स्टाईलमध्ये दिनेशने स्टम्पिंग केले त्याची स्टाईल पाहता अनेकांना धोनीची आठवण झाली. धोनीही अशाच प्रकारे स्टम्पिंग करतो. रहाणेच्या रुपात राजस्थान रॉयल्सच्या रुपाने पहिला विकेट मिळाला.
राजस्थान- 160/8 (20 ओवर) (रहाणे- 36, शॉर्ट- 44)
कोलकाता - 163/3 (18.5 ओवर) (उथप्पा- 48, कार्तिक- 42*)