बंगळुरू : भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्ट मॅचला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 347/6 एवढा आहे. ओपनिंगला आलेल्या शिखर धवन आणि मुरली विजयनं शतक झळकवलं तर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या लोकेश राहुलनं अर्धशतक केलं.  शिखर धवननं 96 बॉलमध्ये 107 रनची खेळी केली. यामध्ये 3 सिक्स आणि 19 फोरचा समावेश होता. तर मुरली विजयनं 153 बॉलमध्ये 105 रन केल्या. विजयनं 15 फोर आणि 1 सिक्स मारली. लोकेश राहुलनं 64 बॉलमध्ये 54 रन केले. यानंतर बॅटिंगला आलेल्या कोणत्याही भारतीय बॅट्समननी निराशा केली.


कार्तिकचं रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये दिनेश कार्तिक फक्त 4 रन करून आऊट झाला. पण तरी त्याच्या नावावर अनोख्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. दिनेश कार्तिक दोन टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक अंतर असलेला भारतीय खेळाडू बनला आहे. 2004 साली दिनेश कार्तिकनं भारतीय टीममध्ये पदार्पण केलं होतं. पण यानंतर कार्तिकला जास्त टेस्ट मॅच खेळता आल्या नाहीत. कार्तिकनं आत्तापर्यंत 27 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. 2010 साली बांगलादेशविरुद्ध कार्तिक शेवटची टेस्ट खेळला होता.


2010नंतर आत्तापर्यंत भारतानं 87 टेस्ट मॅच खेळल्या. यातल्या एकाही टेस्टमध्ये कार्तिकला संधी मिळालेली नव्हती. 87 मॅचनंतर आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये कार्तिकची निवड करण्यात आली. याआधी पार्थिव पटेलच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. दोन मॅचमध्ये खेळताना 83 मॅचमध्ये खेळायची संधी पार्थिव पटेलला मिळाली नव्हती.