टीम इंडियाच्या `या` 5 क्रिकेटचं विवाहित महिलेशी लग्न, या यादीत धक्कादायक नावं
बॉलिवूडपासून ते हॉलीवूड आणि क्रिकेटर्सपर्यंत सगळ्यांच्या बाबतीत घडलं आहे.
मुंबई : प्रेम ही अशी गोष्ट आहे, जी कुठे, कधी, कसं आणि कोणासोबत होईल हे काही सांगता येत नाही. प्रेमात लोकं ना वय पाहात ना व्यक्तीचा भूतकाळ पाहात. बॉलिवूडपासून ते हॉलीवूड आणि क्रिकेटर्सपर्यंत सगळ्यांच्या बाबतीत घडलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा क्रिकेट्स बद्दल सांगणार आहोत, ज्यांनी घटस्फोट झालेल्या तरुणीशी लग्नं केलं आहे. क्रिकेटपटूंच्या या यादीत 5 भारतीयांचा समावेश आहे. चला अशा क्रिकेटर्सवर एक नजर टाकू ज्यांनी घटस्फोटित महिलेशी लग्न केले आहे.
शिखर धवन
शिखर धवनने 2012 मध्ये आयेशा मुखर्जीसोबत लग्न केले. आयशा ही मेलबर्नमध्ये राहणारी ब्रिटीश बंगाली आहे. आयेशाचा पहिल्या लग्नानंतर घटस्फोट झाला होता. तिला पहिल्या पतीपासून दोन मुलीही आहेत. आयशा शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे, पण त्यानंतरही दोघेही एकमेकांसोबत आनंदाने राहत होते. परंतु हल्लीच शिखरचं हे नातं संपलं आहे.
अनिल कुंबळे
भारताचा दिग्गज लेगस्पिन गोलंदाज अनिल कुंबळेच्या पत्नीचाही पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. चेतना नावाच्या या महिलेसोबत कुंबळेने 1999 मध्ये लग्न केले. आता हे जोडपे दीर्घकाळ एकमेकांसोबत आनंदाने राहत आहेत.
मोहम्मद शमी
या यादीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नावही आले आहे. शमीने 2014 मध्ये हसीन जहाँशी लग्न केले. मात्र, आता या दोघांमध्ये काहीही चांगले चालत नाही आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे राहतात. हसीनचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता.
मुरली विजय
भारताचा सलामीवीर मुरली विजयने निकिता वंजारासोबत लग्न केले. निकिता ही टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकची पहिली पत्नी होती, पण नंतर तिने कार्तिकसोबत घटस्फोट घेतला आणि विजयसोबत लग्न केले. अनेकवेळा लोक यासाठी या दोन खेळाडूची खिल्ली उडवतात.
व्यंकटेश प्रसाद
माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादनेही घटस्फोटित महिलेशी लग्न केले. 1996 मध्ये व्यंकटेश प्रसाद यांनी जयंती नावाच्या महिलेशी लग्न केले, तिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. या दोघांची भेट अनुभवी गोलंदाज अनिल कुंबळेने केली होती.