`DRS`चा अर्थ धोनी रिव्ह्यू सिस्टिम, पुन्हा झालं सिद्ध
चेन्नई कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने आपण घेतलेला रिव्ह्यू फेल जात नाही हे पुन्हा सिद्ध केलय.
नवी दिल्ली : चेन्नई कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने आपण घेतलेला रिव्ह्यू फेल जात नाही हे पुन्हा सिद्ध केलय. कोलकाता आणि चेन्नईमध्ये काल रंगतदार सामना रंगला. यामध्ये ख्रिस लिन आऊट झाला पण अम्पायरने त्याला आऊट दिलं नाही. पण धोनीने घेतलेल्या रिव्ह्यूमुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये जाव लागलं. बॉल त्याच्या बॅटला लागून स्लीपला असलेल्या शेन वॉटसनच्या हातात गेला. धोनी आणि त्याच्या टीमने ख्रिस आऊट असल्याचे अपील केले. पण अम्पायरने त्याला नॉट आऊट दिलं. त्यानंतर धोनीने डीआरएस (अंपायर डिसीजन रिव्ह्यू सिस्टम) घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अम्पायरनेदेखील लिनला आऊट दिल.
चेन्नईची हार
ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईच्या टीमने १७७ रन्स बनविले होते. याचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाने १७.४ ओव्हरमध्ये १८० रन्स करत मॅच खिशात टाकली.