मुंबई: BCCIने नुकतंच टीम इंडियातील खेळाडूंची खेलरत्न आणि अजुर्न पुरस्कारासाठी 5 खेळाडूंच्या नावाची शिफारस केली. त्यापाठोपाठ आता 100 आणि 200 मीटर धावपटू असलेल्या महिला खेळाडूची देखील खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. या महिला खेळाडूला लोक Lesbian वरून अनेक टोमणे मारायचे. अनेकदा हिणवलं जायचं अशा परिस्थितीत लोकांच्या तोंडावर आपल्या कामगिरीनं या महिला खेळाडूनं चपराक मारली आहे. या महिला खेळाडूची शिफारस आता खेलरत्नसाठी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताची 100 आणि 200 मीटर स्टार दुती चंदने टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आणि लोकांना आश्चर्यानं तोंडात बोट घालण्यास भाग पडलं. 100 मीटरमध्ये 44 व्या आणि 200 मीटरमध्ये 51 व्या क्रमांकाची कमाई करुन तिने ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण केलं. एवढेच नाही तर ओडिशा सरकारने खेल रत्न पुरस्कारासाठी दुतीचे पुढे केलं आहे. 



ओडिशा सरकारने खेलरत्न पुरस्कारासाठी दुती चंदच्या नावाची शिफारस केली. दुतीचं नाव पुढे झाल्याचं वृत्त जेव्हा तिला समजलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने ट्विट करत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे आभार मानले. दुती ही भारतातील सर्वात वेगवान महिला धावपटू आहे. एकीकडे ऑलिम्पिकसाठी निवड आणि दुसरीकडे खेलरत्नसाठी शिफारस हा आनंद द्विगुणीत करणारा क्षण असल्याचं दुतीनं म्हटलं आहे.


दुतीचा इथवरचा प्रवास खूप अडचणी आणि अंगावर शहारे आणणारा होता. एकेकाळी आपली ट्रेनिंग किट विकत घेण्यासाठी तिच्याकडे पैसेही नव्हते. इतकेच नाही तर 2019 मध्ये तिने एक खुलासा केला ज्याने संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला. आपण Lesbian असल्याचे दुतीनं संपूर्ण जगासमोर कबूल केलं होतं. त्यानंतर जगभरातून तिला खूप मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. इतकच नाही तर गावात खूप छळही सहन करावा लागल्याचं तिने सांगितलं. तिचं एका मुलीवर प्रेम असून तिच्यासोबत राहण्यासाठी कुटुंबियांचाही नकार असल्याचं तिने सांगितलं होतं.