मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमियर लीग 14 चे जेतेपद पटकावले आहे. शुक्रवारी खेळलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव केला. चेन्नईचे हे चौथे आयपीएल जेतेपद होते. यापूर्वी त्याने 2010, 2011 आणि 2018 मध्ये ट्रॉफी जिंकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण टीम जल्लोषात होती. दसऱ्याचा दिवस होता आणि CSK ने चौथ्यांदा जेतेपद पटकावले. आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण टीम सेलिब्रेशन करताना दिसली.


सामना संपताच खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारून अभिनंदन करण्यास सुरुवात केली. सामना संपल्यानंतर बसने हॉटेलवर जाताना संपूर्ण संघाने बसमध्ये ही सेलिब्रेशन केलं. यावेळी ड्वेन ब्राव्होने गाणे म्हटलं. इतर खेळाडूंना त्याला टाळ्या वाजवत साथ दिली.



कोलकात्याने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फाफ डू प्लेसिसने 86 धावा केल्या. ज्यामुळे सीएसकेने 3 बाद 192 अशी मजबूत धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ नऊ विकेटवर 165 धावाच करू शकला.