Mohammad Azharuddin : भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन याचा अडचणीत वाढ झाली असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला ईडने समन्स पाठवलं आहे. अजहरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट एसोसिएशनच्या फंडाचा दुरुपयोग केल्याचा आरोप असून यात 20 कोटींची हेराफेरी केल्याचे सांगण्यात आले आहे. समन्स मिळाल्यामुळे अजहरुद्दीनला गुरुवारी ईडी समोर हजर राहावे लागेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीच्या सूत्रांनुसार हैदराबाद क्रिकेट एसोसिएशनमध्ये पैशांचा घोळ झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यानंतर ईडीने एचसीएच्या अधिकाऱ्यांविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाची नोंद केली आहे. ईडीने तेलंगणामध्ये ९ ठिकाणावर छापेमारी केली असून येथून महत्वपूर्ण कागदपत्र आणि डिजिटल उपकरण ताब्यात घेण्यात आली आहेत. 


काय आहे नेमकं प्रकरण? 


मनी लॉन्ड्रिंगचं संपूर्ण प्रकरण हे हैद्राबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या निर्माणात झालेल्या पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणाचे आहे. अधिकाऱ्यांनी खासगी कंपन्यांना चढ्या दराने कंत्राटे देऊन असोसिएशनचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने तीन एफआयआर नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे. मोहम्मद अजहरुद्दीन विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असोसिएशनचे सीईओ सुनील कांत बोस यांनी केली होती. अजहरुद्दीन त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले असून हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा :  ICC Ranking मध्ये टीम इंडियाचा दबदबा, यशस्वीची तिसऱ्या नंबरवर झेप तर कोहलीचे टॉप 10 मध्ये पुनरागमन


 


मोहम्मद अजहरुद्दीनची कारकीर्द : 


भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनने 99 टेस्ट सामने खेळेल असून यात 6215 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाकडून 334 वनडे सामने खेळताना 9378 धावा केल्या आहेत. वनडेत अजहरुद्दीनने 12 विकेट्स सुद्धा घेतले आहेत. 3 जून 2000 रोजी मोहम्मद अजहरुद्दीनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.