मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या विवाहानंतर टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या चर्चेत आला आहे.


पहिल्यांदा बोलली अभिनेत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. अभिनेत्री एली अवराम आणि हार्दिक पांड्या यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा होत्या. पण यावर आता तिने खुलासा केला आहे.


संबंधावर काय बोलली


हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्याच्या लग्नात देखील ती दिसली होती. आता हार्दिक पांड्यासोबत असलेल्या संबंधावर एली अवरामने मौन सोडलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे.


अफेअरच्या होत्या चर्चा


एली अवरामने म्हटलं, 'लोकांचं काम या अफवांवर विश्वास ठेवणं आहे. मला यावर कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. गेल्या काही दिवसांपासून माझाबाबतीत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत पण मला यावर कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. एक सेलिब्रिटी असतांना तुमच्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात. तुम्हाला याची सवय पाहिजे. तुम्ही अफवांवर काहीच करु शकत नाही.'