एजबॅस्टन : टीम इंडियाचा (Team India) युवा उपकर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात खणखणीत वनडे स्टाईल शतक ठोकलंय. पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवं शतक ठरलं आहे. पंतने आपला संघ अडचणीत असताना मैदानावर उभं राहत निर्णायक खेळी केली. पंतने अवघ्या 89 बॉलमध्ये 15 चौकार आणि 1 खणखणीत सिक्स ठोकत हे शतक पूर्ण केलं. (eng vs ind 5th rescheduled test match day 1 team india vice captain rishabh pant scores century in crucial moment against england)


इंग्लंडच्या गोलंदाजाना जोरदार चोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंत जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा टीम इंडियाची 5 बाद 98 अशी स्थिती होती. मात्र पंतने टीम इंडियाचा डाव सावरला. पंतने इंग्लंडच्या जेम्स एंडरसन, बेन स्टोक्स आणि जॅक लीच यासारख्या भेदक गोलंदांजाचा चांगलाच समाचार घेतला. पंतने या शतकी खेळीदरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली.


इंग्लंड विरुद्ध दुसरं शतक 


पंतचं इंग्लंड विरुद्धची ही दुसरी शतकी खेळी ठरली आहे. पंतने याआधी 2018 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी कारकिर्दीतील पहिलवहिलं शतक झळकावलं होतं. तेव्हा पंतने 114 रन्स केल्या होत्या.  


पंतची ऐतिहासिक कामगिरी


पंत या शतकी खेळीसह इंग्लंडमध्ये 2 वेळा शतक ठोकणारा पहिला भारतीय विकेटकीपर बॅट्समन ठरला आहे. तसेच पंतने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांमध्ये पहिला भारतीय विकेटकीपर म्हणून शतक ठोकणारा फलंदाज असा मान मिळवला आहे.