Virat Kohli Wicket : विराटचा फ्लॉप शो कायम, इंग्लंड विरुद्ध पुन्हा निराशा
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एजबेस्टनमध्ये पाचवा कसोटी सामना ((eng vs ind 5th rescheduled test) खेळवण्यात येत आहे.
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एजबेस्टनमध्ये पाचवा कसोटी सामना (eng vs ind 5th rescheduled test) खेळण्यात येत आहे. टीम इंडियाची या सामन्यातील पहिल्याच दिवशी घसरगुंडी झाली आहे. इंग्लंडने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) यावेळेसही पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. विराट अवघ्या 11 धावा करुन तंबूत परतला. (eng vs ind 5th rescheduled test match day 1 team india virat kohli out on matthew potts bowling against englalnd at edgbaston)
विराट गेल्या काही काळापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. त्याला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे विराट आता किमान इंग्लंड विरुद्धच्या या कसोटीत चांगली कामगिरी करत पुनरागमन करेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र विराटने आऊट होत चाहत्यांचा हिरमोड केला. विराटने 19 बॉलमध्ये 11 धावा केल्या. यात त्याने 2 चौकार लगावले.
विराटला इंग्लंडचा युवा बॉलर मॅथ्यू पोट्सने आऊट केलं. मॅथ्यूने नुकत्याच न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण केलं होतं. मॅथ्यूने त्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावरच त्याला टीम इंडिया विरुद्धच्या कसोटीसाठी संधी देण्यात आली.
विराट जेवढा वेळ मैदानात राहिला, तेवढा वेळ तो चांगला खेळत होता. विराटने लेग साईडला 2 चौकारही लगावले. मात्र मॅथ्यूने टाकलेला बॉल विराटच्या बॅटला लागून स्टंपवर जाऊन आदळला.
विराटची निराशाजनक कामगिरी
विराटला इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत विशेष असं काही करता आलेलं नाही. विराटने आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 229 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.