Team India Tour Of England : टीम इंडिया जुलै-ऑगस्ट दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर (Team India Tour Of England) असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 1 टेस्ट, 3 वनडे आणि टी 20 सामने खेळणार आहे. यातील एकमेव कसोटी सामना हा पुर्ननियोजित करण्यात आला आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही पाचवी कसोटी रद्द करण्यात आली होती. याआधी टीम इंडियासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (eng vs ind team india tour of england 2022 star cricketer k l rahul may miss 5th test match due to injuery)


या स्टार खेळाडूच्या खेळण्यावर सस्पेंस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएल राहुलला (KL Rahul) दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या या एकमेव कसोटी सामन्याला मुकावं लागू शकतं. केएलला याआधी दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेतील नेतृत्वाची संधी गमवावी लागली. आता क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, केएल या एकमेव कसोटीतून बाहेर पडू शकतो. 


...तर जबाबदारी कोणाला? 


केएल कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. केएलला दुखापतीमुळे बाहेर झाल्यास ऋषभ पंतला  (Rishabh Pant) ही जबाबदारी मिळू शकते. 


इंग्लंड दौऱ्यसााठी टीम इंडिया  


रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.