England Allrounder Ben Stokes opts out of T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक देखील जाहीर झालंय. त्यानुसार एकूण 20 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. टी 20 वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन हे अमेरिका आणि विंडिजमध्ये संयुक्तरित्या करण्यात आलं असल्याने यंदाचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) रोमांचक होणार हे आता स्पष्ट झालंय. अशातच आता इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) याने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून माघार घेतली आहे. इंग्लिश क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे आता कॅप्टन जॉस बटलर (Jos Buttler) याचं टेन्शन वाढलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला बेन स्टोक्स


मी कठोर परिश्रम करत आहे आणि क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये ऑलराऊंडर म्हणून भूमिका पार पाडण्यासाठी माझा बॉलिंग फिटनेस बॅकअप करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आयपीएल आणि विश्वचषकातून बाहेर पडणं ही मला आशा आहे की नजीकच्या भविष्यासाठी मला अष्टपैलू बनण्याची तयारी करेल. माझ्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आणि नऊ महिने गोलंदाजी न केल्यानंतर मी गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून किती मागे होतो हे भारताच्या अलीकडील कसोटी दौऱ्यात स्पष्ट झालंय. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी मी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डरहॅमकडून खेळण्यास उत्सुक आहे, असंही बेन स्टोक्सने म्हटलं आहे.


इंग्लंडची टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची तयारी 4 जूनपासून स्कॉटलंड विरुद्ध बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे सुरू होईल. त्यानंतर ते सुपर 8 आणि बाद फेरीसाठी पात्र होण्यापूर्वी बार्बाडोस आणि अँटिग्वा येथे ऑस्ट्रेलिया, ओमान आणि नामिबियाविरुद्ध गट सामने खेळतील. जॉस बटलरच्या नेतृत्वात 2022 मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करून ट्रॉफी उंचावली होती. या सामन्यात बेन स्टोक्सने विजयी खेळी केली होती. त्यामुळे आता इंग्लंडला मोठा धक्का बसलाय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.



बेन स्टोक्सचं टी-20 करियर


इंग्लंडकडून बेन स्टोक्सने आतापर्यंत 43 टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. त्यात 36 इनिंगमध्ये 128.01 च्या स्टाईक रेटने 585 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 42 फोर अन् 22 सिक्स मारले आहेत. तर बॉलिंगमध्ये 36 इनिंगमध्ये त्याने 26 विकेट्स नावावर केल्या आहेत. विशेष म्हणजे बेन स्टोक्सने गेल्या दोन वर्षात एकही आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना खेळला नाही.