न्यूझीलंडचा धुव्वा उडवून इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये
न्यूझीलंडचा तब्बल ८७ रन्सनं पराभव करत इंग्लंड २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करणारी पहिली टीम ठरली आहे.
लंडन : न्यूझीलंडचा तब्बल ८७ रन्सनं पराभव करत इंग्लंड २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करणारी पहिली टीम ठरली आहे. ३११ रन्सचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ४४.३ ओव्हरमध्ये २२३ रन्स बनवून ऑल आऊट झाला. इंग्लंडच्या लियाम प्लंकेटनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसनच्या ८७ रन्स वगळता कोणत्याही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही.
कार्डिफमध्ये झालेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला पण इंग्लंडनं ३१० रन्सचा डोंगर उभारला. इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्स, जो रूट आणि जॉस बटलरनं हाफ सेंच्युरी झळकावली.
इंग्लंडनंतर आता ग्रुप ए मधून सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करणारी दुसरी टीम कोणती असणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा बांग्लादेश यांना अजूनही ग्रुप ए मधून सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करण्याची संधी आहे.
इंग्लंडनं दोनपैकी दोन मॅच जिंकल्यामुळे त्यांच्याकडे चार पॉईंट्स आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही मॅच पावसानं रद्द झाल्यामुळे त्यांच्याकडेही दोन पॉईंट्स आहेत. बांग्लादेश आणि न्यूझीलंडनं खेळलेल्या दोन मॅचनंतर त्यांच्याकडे प्रत्येकी एक पॉईंट आहे.