England Vs New Zealand : भारतात होत असलेल्या वनडे वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात (England vs New Zealand) न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी शतकी खेळी करत धमाका केला. त्यामुळे वर्ल्ड कपला धमाकेदार अंदाजा सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय. डेवॉन कॉन्वे (Devon Conway) हा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. तर त्यापाठोपाठ रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने देखील शतक ठोकलंय. इंग्लंडकडून जो रूट (joe root) याने सर्वाधिक 77 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. तर कॅप्टन जॉस बटलरने (Jos Buttler) 43 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला 50 ओव्हरमध्ये 282 धावा करता आल्या. मात्र, सध्या मात्र वेगळीच रंगतीये ती क्रिकेटच्या वेगळ्याच इतिहासाची...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या संघाने 4658 वनडे सामन्यांच्या इतिहासात बड्या बड्या संघांना जे जमलं नाही ते करून दाखवलं. न्यूझीलंडविरुद्ध आज इंग्लंडच्या सर्व 11 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठला आला. आत्तापर्यंत वनडे क्रिकेटच्या इतिहासात कोणाही एका संघाच्या फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी करून दाखवलं.



जो रूटच्या 77 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 9 विकेट गमावत 282 धावा केल्या आहेत. हॅरी ब्रुक याने 25 धावांची खेळी केली तर जॉनी बेअरस्टोने 33 धावांचं योगदान दिलं. तर न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 3 तर ग्लेन फिलिप आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 2 बळी घेतले.


दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन


इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.


न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट.