मुंबई: कोरोनाचं धुमशान सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. IPLमध्ये बायो-बबलमध्ये कोरोना घुसला 4 खेळाडू आणि 2 कोच पॉझिटिव्ह आल्यानंतर सामने स्थगित करण्यात आले आहेत. त्यानंतर पुढचे सामने कुठे होतील याबाबत चर्चा सुरू आहे. UAE की इंग्लंड नेमके सामने कुठे होणार याबाबत चर्चा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लिश काऊन्टी क्रिकेटच्या चार प्रमुख संघ, मिडलसेक्स, सरे, वारविकशर आणि लंकाशरने आयपीएल 2021 मधील उर्वरित सामने आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार या चार संघांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहिले असून ते सप्टेंबरच्या उत्तरार्धात ही स्पर्धा पूर्ण करण्याविषयी या पत्रात लिहिलं आहे. आयसीसीच्या मुख्य कार्यकारी बैठकीत बीसीसीआय आणि ईसीबी या विषयी चर्चा करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. 


बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही ठिकाणी IPL खेळवणं इतक्या लवकर निश्चित करणं म्हणजे अति घाई होईल.सध्या तरी UAEमध्ये IPLचे उर्वरित सामने घेण्याची चर्चा आहे.  मात्र फेब्रुवारीमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला. आता मागच्या तीन आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 


आता UAE ऐवजी इंग्लंडचा पर्याय देखील समोर आला आहे. त्यामुळे सामने नेमके कुठे आणि कधी होणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. टीम इंडियाचा आता इंग्लंड दौरा देखील आहे. 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असणार आहे. IPL खरंच इंग्लंडच्या मैदानात होणार की UAEमध्ये होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


देशातील वाढत्या कोरोनाचा फटका अगदी स्टार्सपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांनाच बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. महत्वाची औषधे आणि ऑक्सिजन नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे. यामुळे दररोज हजारो लोक आपला जीव गमावत आहेत.