निवृत्तीच्या अवघ्या 24 तासांतच `हा` खेळाडू बनला निवडकर्ता, कोण आहे 37 वर्षाचा खेळाडू?
अवघ्या 24 तासात नशीब पलटलं! राजीनामा दिलेल्या खेळाडूला लॉटरी, थेट निवड समितीत एन्ट्री
मुंबई : टी20 वर्ल्डकप नंतर (T20 World Cup) अनेक उलटफेर झाले आहेत. काही संघाचे कर्णधार बदलले आहेत, तर टीम इंडिया (Team India) सारख्या बलाढ्य संघाची चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या नेतृत्वाखाली असलेली निवड समिती बरखास्त करण्यात आली. आता नवीन निवडकर्त्यांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. क्रिकेट वर्तुळात या घटनेची चर्चा असताना आता एका संघाने खेळाडूलाच निवडकर्ता बनवलं आहे. त्यामुळे हा संघ कोणता आहे ? व हा खेळाडू कोण आहे? ते जाणून घेऊयात.
हे ही वाचा : टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' सीनियर खेळाडू संघातून बाहेर
वनडे वर्ल्ड कपनंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup) नाव कोरले आहे. या टी20 वर्ल्डकप नंतर मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काही संघाच्या कर्णधारांनी राजीनामा दिला, तर काही खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. भारताच क्रिकेट बोर्ड (बीसीसीआयने) तर चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय राष्ट्रीय निवड समितीची हकालपट्टी केली होती. या घटनेनंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) सर्वांनाच धक्का देणारा निर्णय घेतलाय. निवृत्ती जाहीर केलेल्या खेळाडूला निवड समितीत घेतले आहे.
कोण आहे 'हा' खेळाडू?
टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) आपला संघ मजबूत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने एका 37 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला आपला राष्ट्रीय निवडकर्ता बनवले आहे. या खेळाडूचे नाव ल्यूक राइट आहे.विशेष म्हणजे निवृत्तीच्या अवघ्या 24 तासांत हा खेळाडू इंग्लंडचा निवडकर्ता बनला आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
24 तासात लागली लॉटरी
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या वर्षाच्या सुरुवातीला माजी निवडकर्ता एड स्मिथला काढून टाकले होते.त्यानंतर आता माजी अष्टपैलू खेळाडू ल्यूक राइटला (Luke Wright) आपला राष्ट्रीय निवडकर्ता बनवले आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ल्यूक राइटने एक दिवस आधी क्रिकेटमधून पूर्ण निवृत्ती जाहीर केली होती. ही नवी जबाबदारी पार पाडण्यासाठी राईट यांनी निवृत्ती जाहीर केली होती, असे बोलले जात आहे.
ल्यूक राइट (Luke Wright) यापुढे इंग्लंडसाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघांसाठी खेळाडूंची निवड करेल. या कामात त्याला साथ देण्यासाठी पुरुष संघाचे संचालक रॉब की, एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार आणि प्रशिक्षक यांचीही भूमिका असेल.
कारकिर्द
दरम्यान ससेक्सच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या राइटने (Luke Wright) इंग्लंडकडून 50 एकदिवसीय आणि 51 टी-20 सामने खेळले. या दोघांसह, राइटने 1400 हून अधिक धावा केल्या. याशिवाय त्याने 33 विकेट्सही घेतल्या होत्या.
ल्यूक राइटच्या (Luke Wright) निवृतीनंतर अचानक त्याची निवड समितीत निवड झाल्याने त्याची एकच चर्चा रंगली आहे.