साऊथॅम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारतीय बॉलरनी जोरदार कामगिरी केली आहे. पहिल्याच सत्रामध्ये भारतीय बॉलरनी इंग्लंडला ४ धक्के दिले आहेत. लंचपर्यंत इंग्लंडचा स्कोअर ५७-४ एवढा झाला आहे. जसप्रीत बुमराहला २ आणि ईशांत शर्मा आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली आहे. लंच झाला तेव्हा बेन स्टोक्स १२ रनवर आणि जॉस बटलर १३ रनवर खेळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आलेत. क्रिस वोक्स फिट नसल्यामुळे सॅम कुरनला संधी देण्यात आली आहे. तर मोईन अलीचीही निवड झाली आहे. तर भारतीय टीमनं कोणतेही बदल केलेल नाहीत. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनना दिलासा देणारं वक्तव्य जो रूटनं टॉसवेळी केलं आहे. बेन स्टोक्सच्या गुडघ्याला दुखापत असल्यामुळे तो या मॅचमध्ये खेळत असला तरी बॉलिंग टाकणार का नाही याबाबत शंका आहे, असं रूट म्हणाला. पहिल्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये जो रूटनं भारताला मोक्याच्या क्षणी धक्के दिले होते. ती मॅच भारत फक्त ३१ रननी हारला होता.


पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला होता. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये १-२नं पिछाडीवर असलेली विराटची टीम ही मॅच जिंकून सीरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरली आहे.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा