अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोंलदाजीच्या पुढे इंग्लंडचा संघ फक्त ११२ रनवर ऑलआऊट झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीनंतर इंग्लंडच्या संघाला लवकरच पहिला धक्का बसला, तेव्हा डोम सिब्ले खाते न उघडताच बाद झाला. ईशांत शर्माने त्याला बाद केले. दुसरे यश भारताला अक्षर पटेलने मिळवून दिले. त्याने जॉनी बेयस्टोला खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू केले. जॅक क्रोलेने आपल्या कसोटी कारकीर्दीतील चौथे अर्धशतक 68 बॉलमध्ये पूर्ण केले.


कर्णधार जो रूटच्या रुपात इंग्लंडला तिसरा धक्का बसला. रूटने 17 धावा केल्या. आर अश्विनने त्याला एलबीडब्ल्यू आउट केले. 


महत्त्वाचं म्हणजे आज भारताचा खेळाडू अक्षर पटेल ६ विकेट घेतले. अश्विनला ३ विकेट मिळाल्या तर इशांत शर्माला एक विकेट मिळाली. भारतीय स्पीनर्सने इंग्लंडच्या फलंदाजांना हैराण करुन सोडले. ज्यामुळे ते फक्त ११२ रनवर ऑलआऊट झाले.