ENGvs NZ: लिव्हिंगस्टनचा अफलातून SIX, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...`कडकsss`
England vs New zealand, Livingstone : बिग बॉस बटलर आणि लिव्हिंगस्टन मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आकाशातील चांदणं दाखवत होते. ओव्हर होती 16 वी... ओव्हरचा पाचवा बॉल...
England vs New zealand: सध्या सुरू असलेल्या T20 World Cup चा 33वा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने 20 षटकांत 6 बाद 179 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 6 बाद 159 धावाच करू शकला. त्यामुळे इंग्लंडने 20 धावांनी सामना जिंकला (England defeat New Zealand by 20 runs) आहे. मात्र, या सामन्या दोन्ही संघाने अफलातून खेळी केली. त्यात खास राहिला लिव्हिंगस्टनचा (Livingstone) फ्लॅट सिक्स...
इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New zealand) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने आक्रमक फलंदाजी केली. टी-ट्वेंटीचा बादशाह म्हटला जाणारा बटलर (Jos Buttler) न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्यावेळी लिव्हिंगस्टनने खेचलेला सिक्स पाहून अनेकांना डोळ्यावर विश्वास बसला नाही.
आणखी वाचा- मोठा धक्का! Dinesh Karthik टीम इंडियामधून 'आऊट', वाचा नेमकं कारण काय?
नेमकं काय झालं?
बिग बॉस बटलर आणि लिव्हिंगस्टन मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आकाशातील चांदणं दाखवत होते. ओव्हर होती 16 वी... ओव्हरचा पाचवा बॉल... न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज टीम साऊदीने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लिव्हिंगस्टनने गगनचुंबी षटकार खेचला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी डोकी देखील चक्रावली आहेत.
पाहा व्हिडीओ-
दरम्यान, या विजयासह इंग्लंडचा संघ गट 1 मधून सेमीफायनल (Semifinal) गाठण्याच्या शर्यतीत कायम आहे. आता न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी पाच गुण आहेत. तिन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळले असून आणखी एक सामना खेळायचा आहे. तीन संघांचा प्रत्येकी एक सामना पावसामुळे वाहून गेला होता. न्यूझीलंड चार सामन्यांतून दोन विजय आणि एक पराभवासह पाच गुणांसह पहिल्या स्थानावर असल्याने आता सेमीफायनलची रेस आणखी रंगदार झाली आहे.