मुंबई : इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात लॉकडाऊननंतर पहिला सामना होत आहे. साऊथॅम्प्टन हा कसोटी सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचे खेळाडू तसेच अम्पायर्स यांनी गुडघे जमिनीला टेकले. या सर्वांनी मैदानावर वर्णभेदाच्या विरोधात ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळीचे समर्थन केले. अमेरिकेत पोलीस कोठडीत जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर वर्णभेद विरोध जगभर सुरू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कसोटी सामन्याचा पहिला बॉल फेकण्यापूर्वीच क्षेत्ररक्षण करणारा वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू गुडघ्यावर बसला होता. इंग्लंडचे खेळाडूही गुडघ्यावर बसले. दोन्ही संघांनी त्यांच्या जर्सीच्या कॉलरवर ब्लॅक लाइव्ह्ज मॅटरचा लोगो लावला होता. आयसीसीने त्यांच्या ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 



इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 17.4 षटकांचा सामना झाला. पावसामुळे खेळ थांबवावा लागला. 


पाऊस थांबल्यावर पुन्हा खेळ सुरू झाला. बर्न्स आणि जो डेनली यांनी इंग्लंडची धावसंख्या 35/1 वर आणली. परंतु त्यानंतर कमी प्रकाशामुळे खेळ पुन्हा एकदा थांबविण्यात आला आणि टी ब्रेक झाला. बर्न्स 20 आणि डेनली 14 रनवर खेळत होते.