भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला
भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला आहे.
बर्मिंगहम : भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजचा पहिला सामना एजबॅस्टनमध्ये खेळवण्यात येत आहे. या मॅचमध्ये भारतानं चेतेश्वर पुजाराऐवजी लोकेश राहुलला संधी दिली आहे. टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या कुलदीप यादवला टीममध्ये स्थान मिळालं नाही. आयसीसीच्या टेस्ट बॉलरच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला रवींद्र जडेजाही टीममध्ये नाही.
भारतीय टीम
मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा
इंग्लंडची टीम
एलिस्टर कूक, केटन जेनिंग्स, जो रूट, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जॉस बटलर, सॅम कुरन, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जिमी अंडरसन