नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा बिनाशर्त माफी मागितली आहे. या माफीनाम्यात म्हटले की माझी सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करण्याचा उद्देश कधीच नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे सिनिअर नेता आणि हिमाचल प्रदेशचे हमीरपूरचे खासदार अनुराग ठाकूर यांना सुप्रीम कोर्टाने सात जुलैला सांगितले होते की सुप्रीम कोर्टाचा अवमान प्रकरणात दिलासा मिळण्यासाठी साफ शब्दांत माफी मागायला हवी. 


काय म्हटले आहे अनुराग ठाकूर यांनी माफीनाम्यात 


ठाकूर म्हणाले, सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा कमी करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. अजाणतेपणी चुकीची सूचना आणि चुकीचा प्रसार झाला. त्याबद्दल मी कोणताही संकोच न ठेवता न्यायालयाची बिनशर्त माफी मागतो. 


सुप्रीम कोर्टाने एका पानाचा माफीनामा दाखल करण्याची सूचना केली होती. 


न्यायालयाने १४ जुलैला वैयक्तीक न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश दिले आहे. यावेळी माफी स्वीकारून त्यांच्या विरूद्ध अवमानाची कारवाईचे प्रकरण बंद करणार असल्याचेही न्यायालयाने कळविले आहे.