Mumbai Indians : सर्वांना उत्सुकता लागलेला आयपीएलचा मिनी लिलाव उद्या 19 डिसेंबर रोजी दुबईत होत आहे. उद्या दुपारी 1 वाजता लिलाव (IPL Auction 2024) प्रक्रियेला सुरूवात होईल. मात्र, लिलावाआधीच मुंबई इंडियन्सचा संघ चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कर्णधार बदलल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) अन्याय झाल्याची चर्चा होताना दिसतंय. त्यामुळे आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला रामराम ठोकणार का? असा सवाल विचारला जातोय. मात्र, रोहित मुंबई इंडियन्समधून बाहेर पडू शकतो का? चला तर मग जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेड विंडोमधून आयपीएलच्या फ्रँचायझींनी खेळाडूंची आदलाबदल केली. मुंबई इंडियन्सने या ट्रेड विंडो नियमाचा फायदा घेत हार्दिक पांड्याला संघात सामावून घेतलं. मात्र, 12 डिसेंबरला ट्रेड विंडो बंद झाल्याने अनेक खेळाडूंना लिलावात उतरावं लागतंय. अशातच याच ट्रेड विंडो नियमाचा फायदा रोहित शर्माला घेता येऊ शकतो. आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबरला झाल्यावर पुन्हा एकदा आयपीएल ट्रेड विंडो सुरु होणार आहे. 20 डिसेंबरपासून आयपीएलची ट्रेड विंडो सुरु होणार आहे. या कालावधीत रोहित शर्माला मुंबईमधून बाहेर पडण्याची संधी आहे.


कोणत्याही एका फ्रँचायझीला जर रोहित शर्माला संघात घेण्याची इच्छा असेल तर ती फ्रँचायझी मुंबई इंडियन्सला संपर्क करू शकते. मात्र, लिलावातून पैसे उरले तरच रोहितला घेता येईल. नाहीतर फ्रँचायझीला एका खेळाडूबरोबर देवाण घेवाण करावी लागेल किंवा रोहितसाठी त्यांना पैसे मोजावे लागतील. 


IPL 2024 : हार्दिक पांड्यानंतर MI खेळणार दुसरी चाल, 'या' खेळाडूंना घेण्यासाठी ओतणार पाण्यासारखा पैसा


दरम्यान, लिलावासाठी निवडलेल्या 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आहेत, तर 119 परदेशी खेळाडू आहेत. तसेच, या यादीत 111 कॅप्ड आणि 215 अनकॅप्ड खेळाडू आहेत. आयपीएलने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.