IPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर!

Mumbai Indians In IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय.

सौरभ तळेकर | Updated: Dec 17, 2023, 10:50 PM IST
IPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर! title=
Mumbai Indians In IPL 2024 Auction

MI Squad IPL 2024 Auction : आयपीएल लिलावाआधीच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) घेतलेल्या दोन निर्णयामुळे चर्चेत आली आहे. मुंबईने थेट गुजरात टायटन्सच्या म्होरक्याला संघात सामील करून घेतलं. तर संघात येताच हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) प्रमोशन देखील झाल्याचं पहायला मिळालं आहे. रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक पांड्या संघाचं नेतृत्व करेल. फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे मुंबईचे खेळाडू नाराज असल्याचं समोर आलंय. त्यातच आता सचिनच्या मॅन्टॉरशीपवर देखील प्रश्नचिन्ह लागला आहे. मुंबईच्या बारा भानगडी सुरू असलेल्या तरी ऑक्शनमध्ये (IPL 2024 Auction) मुंबई इंडियन्सला योग्य गेम प्लॅनने मैदानात उतरावं लागेल.

मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय. याचीच कमी दूर करण्यासाठी मुंबईला या लिलावात मोठा माईंड गेम खेळावा लागणार आहे. पांड्याला संघात घेतल्यानंतर मुंबईकडे आता 17.25 कोटींची रक्कम शिल्लक आहे. एवढ्या कमी पैश्यात मुंबईला तीन प्रमुख गोलंदाजांना संघात सामील करावं लागेल.

कोणत्या खेळाडूंवर MI ची नजर

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज गेराल्ड कोइत्झी याच्यावर मुंबई इंडियन्स डाव लावू शकते. गेराल्ड कोइत्झी याची बेस प्राईज 2 कोटी असल्याने  मुंबईच्या हातात हा नवखा खेळाडू लागणार का? असा सवाल विचारला जातोय. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा देखील मुंबई इंडियन्सच्या रडारवर आहे. त्याचबरोबर मुंबई मिचेल स्टार्कवर बोली लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं.

मुंबईला स्पिन डिपार्टमेंटमध्ये पीयूष चावलाच्या जोडीचा गोलंदाज हवा आहे. त्यामुळे मुंबई अफगाणिस्तानचा 'मिस्ट्री स्पिनर' मुजीब उर रहमान याच्यावर नजर ठेऊन आहे. वर्ल्ड कपमध्ये भन्नाट कामगिरी करणाऱ्या मुजीबवर यंदा तगडा पैसा लावला जाईल, अशी शक्यता आहे. जर मुजीब हाती गवसला नाही, तर मुंबई वानिंदू हसरंगावर डाव लावण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सदेखील एका चांगल्या स्पिनरच्या शोधात आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर नजर ठेऊन असल्याचं स्पष्ट दिसतंय.

आणखी वाचा - IPL 2024 : रोहितला नारळ दिल्यानंतर सचिन तेंडूलकरचा तडकाफडकी निर्णय? हार्दिकच्या पलटणला मोठा धक्का!

मुंबई इंडियंन्सचा संघ (Players Retained By MI): हार्दिक पंड्या (C), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडूलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडोर्फ, रोमारियो शेफर्ड.

मुंबई इंडियन्सने सोडलेले खेळाडू (Players Released By MI) : ख्रिस जॉर्डन, डुआन जॅनसेन, हृतिक शोकीन, झ्ये रिचर्डसन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद. अर्शद खान, राघव गोयल, रमणदीप सिंग, रोली मेरेडिथ, संदीप वॉरियर, ट्रिस्टन स्टब्स.