`दुसऱ्यांच्या पत्नीबरोबर फ्लर्ट केलं तर...`; चहलचा धनश्रीवरुन श्रेयस अय्यरला टोला?
Yuzvendra Chahal On Shreyas Iyer Dhanashree: युजवेंद्र चहलला भारताच्या वर्ल्ड कप संघामध्ये स्थान मिळालेलं नाही. न्यूझीलंड आणि भारतादरम्यानच्या सामन्यानंतर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
Yuzvendra Chahal On Shreyas Iyer Dhanashree: भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यर फारच स्वस्तात परतला. महत्त्वाच्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यर झटपट बाद झाल्याने त्याला ट्रोल केलं जात होतं. मात्र अशातच श्रेयस अय्यरसंदर्भात एक नकोशी पोस्ट भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या नावाने व्हायरल होत आहे.
बाऊन्सरवर झेलबाद
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये 274 धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी उत्तम सुरुवात केली. मात्र दोघेही एकामागोमाग एक बाद झाले. रोहित शर्मा अर्धशतकापासून 4 धावा दूर होता तेव्हाच तो बाद झाला. तर शुभमन गिल सुद्धा 26 चेंडूंमध्ये 31 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर श्रेयस अय्यरने विराट कोहलीबरोबर पार्टनरशीप करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रेंट बोल्टने श्रेयस अय्यरला 33 धावांवर बाद केलं. मोठा फटका मारण्याच्या नादावर बाऊन्सरवर श्रेयस झेलबाद झाला.
ती पोस्ट व्हायरल
श्रेयस अनेकदा बाऊन्सरवर चेंडूवर बाद झाल्यावरुन अनेकदा श्रेयस असा बाद झाल्याच संदर्भ कॉमेंट्री बॉक्समधूनही देण्यात आला. सोशल मीडियावरही श्रेयसला ट्रोल करण्यात येऊ लागले. अशातच एका व्हायरल ट्वीटनं अनेकांचं लक्ष वेधलं. भारताच्या वर्ल्ड कप संघात स्थान न मिळालेल्या युजवेंद्र चहलच्या नावाने असलेल्या एका अकाऊंटवरुन श्रेयस अय्यरबद्दल एक वागद्रस्त ट्वीट करण्यात आलं. "जेव्हा तुम्ही इतर कोणाच्या तरी पत्नीबरोबर फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करता तेव्हा असं होतं. हे तुझं कर्म आहे श्रेयस अय्यर", अशा कॅप्शनसहीत अय्यरचा एक जुना फोटो या युजवेंद्र चहलच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला होता. या ट्वीटला स्क्रीनशॉर्ट तुफान व्हायरल झाला.
सत्य आलं समोर
मात्र नंतर हे ट्वीट खोट्या अकाऊंटवरुन करण्यात आल्याचं समोर आलं. ज्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली ते व्हेरिफाइड नाही. युजवेंद्र चहलचं खरं अकाऊंट व्हेरिफाइड आहे. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा करत ही पोस्ट केल्याचं समोर आलं. त्यानंतरही हा स्क्रीनशॉट व्हायरल होता होता. अनेकजण या खोट्या म्हणजेच पॅरडी अकाऊंटवरील पोस्टला बळी पडले.
अनेकदा दोघांबद्दल होते चर्चा
श्रेयस अय्यर आणि युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री हे दोघेही चांगले मित्र आहेत. अनेकदा श्रेयस अय्यर आणि धनश्री एकत्र दिसून आले आहेत. अनेक रिल्समध्ये या दोघांनी एकत्र डान्सही केला आहे. मात्र या दोघांबद्दल अनेक अफवा वेळेवेळी व्हायरल होत असतात. या अफवांना या तिघांपैकी कोणीही फारसं महत्त्व देत नाही.
नुकतेच चहल आणि धनश्रीने डेटचे फोटो शेअर केले होते.